जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादनात माफक वाढ 

नवी दिल्ली: जूलै महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी काल जाहीर करण्यात आली. त्यानुसार या महिन्यात औद्योगिक उत्पादन 6.6 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू, मॅन्युफ्युफॅक्‍चरींग क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे एकूणच औद्योगिक उत्पादन वाढले असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी या महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 1 टक्‍क्‍याने वाढले होते. कारण त्यावेळी नोटाबंदीचा आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. जून महिन्यात औद्योगिक उत्पादन 6.8 टक्‍क्‍यांनी वाढले होते. त्यामुळे या आघाडीवर सरकारला आणखी बरेच काम करावे लागणार असल्याचे समजले जात आहे.
एप्रिल ते जुलै या काळात औद्योगिक उत्पादन 5.4 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. जे की, गेल्या वर्षी या काळात केवळ 1.7 टक्‍क्‍यांनी वाढले होते. 32 पैकी 22 उद्योगांच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे. आगामी काळातही यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)