जुलैमध्ये 14 लाख रोजगारनिर्मिती 

नवी दिल्ली: जुलै महिन्यात साधारण 14 लाख नवीन रोजगारनिर्मिती झाली. गेल्या 11 महिन्यांतील ही वाढ सर्वाधिक असल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालातून समजते. सप्टेंबर 2017 पासून एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी) नवीन सदस्यांची संख्या वाढत 1.34 कोटीवर पोहोचली आहे.
जुलै महिन्यात ईएसआयसीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या आरोग्य विमा योजनेमध्ये 13.97 लाख नवीन सदस्य जोडले गेले आहेत. या अहवालानुसार महिन्याच्या आधारे सप्टेंबर 2017 नंतर पहिल्यांदाच सदस्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. हा अहवाल ईएसआयसी, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना आणि पर्डा यांच्या सामाजिक सुरक्षा योजनेच्या मानांकनावर आधारित आहे.
ईएसआयसीमधील विमा असणाऱ्या सदस्यांची संख्या जुलैमध्ये 2.77 कोटींवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये ती 2.95 कोटी होती. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स ऍक्‍ट, 1948 नुसार विमा संरक्षण अनिवार्य आहे. यामुळे औपचारिक क्षेत्रातील रोजगारनिर्मितीची आकडेवारी समजण्यास मदत होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)