जुन 2017 मधील थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

शिरसगाव येथील शेतकरी आगळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गोपाळपूर- जे शेतकरी 2016 मध्ये थकबाकीत नव्हते, परंतु 31 जून 2017 रोजी थकबाकीत आहेत, अशा शेतकऱ्यांचाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करून त्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शिरसगाव येथील शेतकरी दिपक आगळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सेवा सोसायट्यांनी 1 एप्रिल 2014, 2015 ते 31 मार्च 2016 याकाळात शेतकऱ्यांना पिक व मध्यम मुदत कर्ज वाटप केली आहे. परंतु, या शेतकऱ्यांनी मुदतीत व्याज भरल्यामुळे 2016 मध्ये ते थकबाकीसाठी पात्र ठरले नाहीत. परंतु,2017 च्या कर्जमाफीत हे शेतकरी पात्र ठरतात तरी देखील सरकारने 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 पर्यतच शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. मागच्या कर्जमाफीत हे शेतकरी थकीत असल्यामुळे अपात्र ठरले. परंतु, 31 जून,2017 मध्ये हे शेतकरी थकबाकीमध्ये आहे. या शेतकऱ्यांचा शासनाने विचार केलेला नाही. या शेतकऱ्यांचा शासनाने तत्काळ विचार करावा 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2016 या काळात कर्ज घेतल्यांचा देखील दीड लाख रूपयांपर्यतच्या माफीत समावेश करावा अन्यथा या थकबाकीदार शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष नेते विधानसभा, विधानपरिषद, जिल्हाधिकारी, आमदार बच्चु कडू, आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार नेवासा यांना पाठवल्या आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)