जुन्या वादातून मारहाण करत एकास लुटले

पुणे- जुन्या वादातून एकास मारहाण करुन हातातील घड्याळ व रोकड चोरण्यात आली. याप्रकरणी सहा पुरुष व दोन महिलांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जितेंद्र सोळुंखे (44, रा. तरवडे वस्ती) हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बजरंग पोकळे यांना भेटण्यासाठी वडगाव धायरी येथे गेले होते. त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांच्या तोंडओळखीचे आरोपी तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन जितेंद्र यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्‍याने व लोखंडी पायपाने मारहाण केली.

यामध्ये त्यांच्या हातास, डोक्‍यास आणी मनगटावर मार लागला. यानंतर जबरदस्तीने त्यांच्या हातातील घड्याळ व रोख 17 हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना 9 जानेवारी 2018 रोजी घडली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)