जुन्या वादातून दुग्ध व्यावसायिकाचा खून

औंधमधील घटनेने खळबळ : हल्लेखोर राजकीय पक्षाशी संबंधित

पुणे – जुन्या वादातून एका दूध व्यावसायिकाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरूवारी पहाटे औंध येथील कस्तुरबा वसाहतीमध्ये घडली. या घटनेमुळे वसाहतीमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोहित अशोक जुनवणे (वय 28, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश अशोक जुनवणे याने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याप्रकरणी गजेंद्र उर्फ दादा तुळशीराम मोरे (वय 46) याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनवणे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. तर, मोरे हादेखील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. मोरे याने अनधिकृत घर बांधल्याप्रकरणी जुनवणे याने महापालिकेकडून माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली होती. त्यावरुन 5 दिवसांपूर्वी रोहित व मोरे याची औंध येथील महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात भांडणे झाली होती. त्याचवेळी मोरे याने जुनवणे यास मारण्याची धमकी दिली होती. यापूर्वीही दोघांमध्ये माथाडी कामावरून अनेकदा वाद झाले होते.

जुनवणे हा दररोज पहाटे दूध वाटप करण्यासाठी जातो, याबाबतची माहिती मोरे, कदम व त्यांच्या साथीदारांना होती. त्यानुसार गुरूवारी पहाटे साडेपाचच्या वेळेस जुनवणे कस्तुरबा वसाहतीमध्ये दूध वाटप करण्यासाठी आला होता. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये जुनवणेच्या डोक्‍यावर गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर त्याची बोटेही तुटली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यास तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या घटनेनंतर परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, चतुःशृंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)