जुन्या भांडणातून युवकावर महिलेने केला चाकू हल्ला

कोरेगाव – किन्हई, ता. कोरेगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून माधुरी विजय घाडगे यांनी नितीन कुशाबा लवंगारे वय 33, रा. अंबवडे संमत कोरेगाव यांच्यावर चाकू हल्ला केला. मित्रांनी ऐनवेळी गराडा घातल्याने लवंगारे थोडक्‍यात बचावले. हा प्रकार शुक्रवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 4. 30 च्या सुमारास किन्हईत घडला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन लवंगारे व सैन्य दलातील जवान विजय घाडगे यांच्या मोटारसायकलीचा तीन ते चार वर्षांपूर्वी अपघात झाला होता. या अपघाताची कोठेही तक्रार न करता, आपआपसात चर्चा करुन वाद मिटवण्यात आला होता. त्या दिवसापासून विजय यांची पत्नी माधुरी, बंधू प्रमोद हे जाता येता रागाच्या नजरेतून बघत असत. सैन्य दलातून सुट्टीवर आल्यानंतर विजय व त्याचे कुटुंबीय जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तुला सोडणार नाही, असे सातत्याने म्हणत असत. दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 4.30च्या सुमारास नितीन लवंगारे हे कवडेवाडी येथे जाण्यासाठी किन्हईतील मुख्य चौकात थांबले होते. तेथे मित्र लखन पैलवान, रोनक देशमुख, महेश रणदिवे यांच्यासोबत बोलत असताना अचानक माधुरी घाडगे यांनी तुला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत चाकुने हल्ला केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही कळायच्या आत दुसऱ्यांदा पाठीवर डाव्या बाजूने वार केला. माधुरी यांचे दीर प्रमोद व सासरे महादेव घाडगे हे माधुरी यांना त्याला जीवंत सोडू नकोस, असे म्हणत होते. या हल्ल्यानंतर माधुरी या मोटारसायकलवर बसून निघून गेल्या.
नितीन यांना मित्रांनी किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. नितीन यांनी रुग्णालयात दिलेल्या खबरी जबावावरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक ए. जे. सपकाळ तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)