जुन्या भांडणातून एकाला मारहाण

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी चार जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मारहाण केलेल्या व्यक्तिचे नाव प्रदीप गोकुळ गोसावी आहे. पोलिसांनी राजेश रोहिदास गोसावी (रा. मंचर) व अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विद्या प्रदीप गोसावी यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एकलहरे येथुन प्रदीप गोसावी हे कळंब येथे घरी येत असताना राजेश गोसावी आणि इतर तिघांनी जुन्या भांडणाचा राग डोक्‍यात धरुन त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटुन घरी येत असताना पाठलाग राजेश गोसावी यांनी त्यांना घराबाहेर ओढुन परत मारहाण केली. त्यावेळी प्रदीप गोसावी यांची पत्नी विद्या गोसावी यांना देखील शिवीगाळ केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)