जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर कंटेनर-दुचाकी अपघात

  • दुचाकी चालकाचा मृत्यू; सहप्रवासी गंभीर जखमी

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत परिसरात खामशेत जवळील इंद्रायणी पुलाजवळील सोनू ढाब्यासमोर कंटेनर आणि दुचाकी यांच्यामधील अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे.खामशेत येथे शनिवारी (दि. 12) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली.

मिलिंद महादेव ढोंगळे (वय 25, रा. घोटवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकी चालकाच्या मागे बसलेला गणेश शशिकांत पाटणे (वय 22, रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर (एम. एच. 14 ए. एस. 8623) तसेच दुचाकी (एम. एच. 09 ए. यु. 2211) यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मिलिंद महादेव ढोंगळे याचा मृत्यू झाला. दुचाकीचालकाच्या मागील सीटवर बसलेल्या सहप्रवासी गणेश शशिकांत पाटणे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना कामशेत येथील संजीवनी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याच्यावर निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

कामशेत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)