जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर डंपरने तिघांना चिरडले

  • पादचाऱ्यांचा मृत्यू : दोघे गंभीर जखमी

तळेगाव दाभाडे – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव डंपरने तीन पादचाऱ्यांना चिरडले. यामध्ये एका अनोळखी व्यक्‍तीचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे खिंडीत, मारुती मंदिरासमोर (ता. मावळ) येथे घडली. मयताचा अद्यापही ओळख पटली नाही.

विष्णू काकोजी कांबळे (वय 60, रा. परंदवडी, ता. मावळ, मूळगाव गेवराई, जि. बीड), लहू पांडुरंग आतबे (वय 32, रा. संभाजीनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ. मूळगाव अहमदपूर, जि. लातूर) असे गंभीर जखमींची नावे आहेत. या प्रकरणी अमर बशीर शेख (रा. पुनावळे, पुणे) असे डंपर चालक आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू कांबळे, लहू आतबे व एक अनोळखी तिघे सोमाटणे येथून लिंब फाटा तळेगाव दाभाडे येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पायी चालत निघाले, ते पादचारी तळेगाव दाभाडे खिंडीत, मारुती मंदिरासमोर आले असता, डंपर (एम. एच. 14 जे. डी. 4001) चालक अमर शेख हा त्याच्या ताब्यातील डंपर पुणे बाजूकडून तळेगाव दाभाडेकडून भरधाव वेगाने जाताना त्या पादचाऱ्यांना चिरडले. त्यात एक जण अनोळखी जागीच मयत झाला.

फिर्यादी विष्णू कांबळे यांच्या कमरेला व डोक्‍याला, तर लहू आतबे यांचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून, ते दोन्ही गंभीर जखमी झाले. डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे तिघे बांधकाम मजुरीचे काम करीत होते. अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्‍तीचा शोध घेण्याचे काम तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)