जुन्नर शहरात महावीर जयंती साजरी

जुन्नर – जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकर भगवान महावीरांचे जन्मकल्याणक गुरुवारी (दि. 29) जुन्नर शहरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने जुन्नर शहरातून भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्वेतांबर मूर्तिपूजक संघ व वर्धमान स्थानकवासी संघ यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते. भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी, आकर्षक फुलांनी सुशोभित केलेला रथ, वाद्यवृंद नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. या मिरवणुकीत जैन बांधव, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत युवकांनी पारंपरिक दांडिया नृत्य सादर केले. जुन्नर नगर परिषदेजवळ नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक भाऊ कुंभार, समीर भगत यांनी महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानिमित्ताने जैन भुवन येथे मुथा परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी अहिंसा रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी “जिओ और जिने दो, अहिंसा परमो धर्म की जय’ आदी घोषणा देण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर सरबत व सुगंधी दुधाचे नियोजन अनुप शाह, हितेश शाह, बाळासाहेब जोशी आणि जैन स्थानकाच्या वतीने करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)