जुन्नर येथे पोलीस दलाचे संचलन

जुन्नर-गणेशोत्सव व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर जुन्नर शहरात शांतता प्रस्थापित होऊन कायदा व सुव्यवस्थेसाठी जुन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने संचलन करण्यात आले असल्याची माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली.
या संचलनामध्ये जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, तोरणा, राजगड, स्टॅकिंग फोर्स, एसआरपीएफ, होमगार्ड या विभागातील अधिकारी व जवान सहभागी झाले होते. या संचलनाचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांनी केले. जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, शीतल चव्हाण, यांसह अठरा जवान, तोरणा पथकाचे एक अधिकारी व 23 जवान, राजगड पथकाचे 22 जवान, स्टॅकिंग फोर्सचे एक अधिकारी व 15 कर्मचारी, दौंड एसआरपीएफचे एक अधिकारी व 23 जवान, होमगार्ड जुन्नर पथकाचे 34 पुरूष व 7 महिला असे जवळपास 170 पोलीस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. यांसह चार मोठी वाहने व पाच पोलीस जीपचा या ताफ्यात समावेश होता. जुन्नर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरून हे संचलन करण्यात आले. गणेशोत्सव व ईद हे धार्मिक सण नागरिकांनी आनंदात साजरे करावे, या उत्सवांमध्ये बाधा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)