जुन्नर द्राक्षमहोत्सवाला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद

शिवनेरी- एमटीडीसी आणि बळीराजा शेतकरी बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने, लेण्याद्रीच्या पायथ्याला असणाऱ्या द्राक्ष ग्राम, गोळेगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या जुन्नर द्राक्ष महोत्सवाचे उदघाटन एमटीडीसीच्या उच्चधिकारी क्षिप्रा बोरा यांच्या हस्ते झाले. यावेळी एमटीडीसी पुणे विभागीय कार्यालयाचे अधिकारी दीपक हरणे, एमटीडीसी माळशेज रिसॉर्टचे अधिकारी गाडेकर, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हडवळे, द्राक्ष उत्पादक जितेंद्र बिडवई, आदिनाथ चव्हाण, समीर जाधव, रामचंद्र काळे, मंगेश डोके आणि जुन्नरमधील शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंबई, पुणे आणि परिसरातून पहिल्या दिवशी 250 पेक्षा जास्त पर्यटकांनी द्राक्ष महोत्सवाला हजेरी लावली. कोकणातून आलेले पर्यटक, अशी द्राक्षांनी लगडलेली बाग पहिल्यांदाच बघत होते. यावेळी जुन्नरविषयी, द्राक्ष शेतीविषयी पर्यटकांना माहिती देण्यात आली. याबरोबरच अगरगावमधील अभिजित रोकडे या शेतकऱ्याच्या वायनरीला भेट देण्याचे नियोजन होते. जवळपास 18 प्रकारच्या वाइनबाबत येथे माहिती देण्यात आली. असा द्राक्ष महोत्सव या परिसरात पहिल्यांदाच भरवण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)