जुन्नर तालुक्‍यात कांदा काढणीला वेग

शेतकऱ्यांनी मिळेल त्या बाजारभावात विकला कांदा

शिवनेरी- जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात नवीन कांदा काढणीला वेग आला असून कांदा लगेच बाजारात विक्रीसाठी नेताना शेतकरी दिसून येत आहेत.
साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात लागवड झालेला नाशिक कांदा आता काढणीला आला आहे. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमधील शेतकरी कांदा काढणीमध्ये व्यस्त आहेत. या वर्षी उन्हाळ्यात घेतलेला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता; परंतु गेल्या वर्षभरात कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी कमी होत गेले आहेत. त्यातच कांदा सडला असून तो फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
आता नवीन नाशिक कांदा आता काढणीला आला असून बहुतेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणी न करता तो लगेचच मिळेल त्या भावात विकून टाकला आहे. कारण कांद्याचा बाजारभाव वाढत नाही आणि कांदा साठवला तर तो टिकत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी विक्रीसाठी कांदा बाजारपेठेत पाठवित आहेत. सध्या कांद्याला तीन ते चार रूपये किलोमागे मिळत आहेत. हा मिळणारा बाजारभाव सुद्धा अतिशय कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)