जुन्नर तालुक्‍यातील 356 मतदान केंद्रांवर होणार नोंदणी

पुणे विभागात दि 23 व 24 रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान

जुन्नर – पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर येत्या शनिवारी, रविवारी (दि. 23, 24) विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.
याबरोबरच सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांना त्यांचे मतदान केद्रांवरील सहाय्यक यांना आपले मतदान केंद्रांवर उपस्थित राहून सर्व पात्र मतदारांची नोंदणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव असल्याची सर्व नागरिकांनी खात्री करून घ्यावी व गरजेनुसार नाव नोंदणीसाठी फॉर्म 6, नाव वगळण्यासाठी फॉर्म 7, मतदार यादीतील नावात व तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म 8 व स्थानांतरासाठी फॉर्म 8-अ मतदान केंद्रावर भरून द्यावेत.
मतदानाचा हक्क बजावताना मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी उपयोगी आहे. मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे.

  • 356 केंद्रांवर होणार नोंदणी
    जुन्नर तालुक्‍यातील 356 मतदान केंद्रांवर नोंदणी होणार असून, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ला मतदान करण्यासाठी आणि मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी या संधीचा सर्व पात्र मतदारांनी लाभ घ्यावा.
    – रवींद्र वळवी, निवडणूक नायब तहसीलदार, जुन्नर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)