जुन्नर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींना मिळणार हायस्पीड इंटरनेट

महानेट प्रकल्पांतर्गत तालुक्‍यातील 142 पंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार

जुन्नर- इंटरनेट जोडणी महानेट प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्‍यातील 142 ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. याकरिता तालुक्‍यात सुमारे 608 किलोमीटर लांबीच्या ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील 13 हजार ग्रामपंचायतींचा लेखाजोखा संबंधित तहसीलला जोडण्यासाठी राज्य शासनाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प 2018 मध्ये सुरु केला होता. सदर योजनेमुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवणे सोयीचे होणार असून निधींच्या खर्चावर बारकाईने देखरेख ठेवणे शक्‍य होणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले.
याप्रसंगी बारवचे सरपंच संतोष केदारी, अमरापुरचे सरपंच संजय गाडेकर, गणेश कासार, अरुण पापडे, अरुण कबाडी, मनिषा लोखंडे, निलेश चव्हाण, गणेश कासार, सिद्धेश ढोले, गणपत कासार आदी मान्यवर उपस्थित होते. एप्रिल अखेर सर्व ग्रामपंचायती या केबलने जोडल्या जाणार असून हे काम करीत असताना रस्ते व इतर सार्वजनिक मालमत्तेला नुकसान न होवू देण्याबाबत आमदारांनी संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)