जुन्नर तालुक्‍यातील किल्ल्यांवर दुर्गपूजा

दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेचा उपक्रम

शिवनेरी-दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेने रविवारी (दि. 24) राज्यातील 131 किल्ल्यांवर दुर्ग पूजेचे आयोजन केले होते. जुन्नर तालुक्‍यातील किल्ले शिवनेरीसह, नारायणगड, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, सिंदोळा या सात किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्यात आली.
किल्ले “शिवनेरी’वर श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पत्नी सकवार बाईसाहेब यांच्या माहेरच्या गायकवाड घराण्यातील वंशज संतोष गायकवाड सरदार (दावडी निमगाव) व शिवाजी ट्रेल, जुन्नर ग्रुप यांच्या उपस्थितीत दुर्गपूजा करण्यात आली. किल्ले ‘हडसर’ वर नागपूरकर भोसले सरकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशनचे प्रशांत बेलवटे व नारायणगड दुर्ग संवर्धन समितीने ‘नारायणगडा’वर, किल्ले ‘चावंड’वर हिस्टरी क्‍लब खामगाव, किल्ले ‘जीवधन’ वर प्राध्यापक आर्टस कॉमर्स व सायन्स महाविद्यालय नारायणगाव, आकाश कांबळे व विद्यार्थी यांनी किल्ले ‘निमगिरी’वर आशिष कांबळे व सहकारी, किल्ले ‘हडसर’ वर मरहट्टे सह्याद्रिचे अमोल ढोबळे ग्रुप यांनी तर किल्ले ‘सिंदोळा’ वर मढ ग्रुपच्या वतीने दिपक काळे यांच्या सहभागातून दुर्ग पूजा करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)