जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात गव्हाचे पीक जोमात

बेल्हे- जुन्नर तालुक्‍याच्या पुर्व भागात गव्हाचे पिक जोमात आल्याचे आले आहे. परीसरात पडणाऱ्या थंडीचा फायदा या पिकाला होणार आहे. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, उंचखडक, गुंजाळवाडी, आळे, वडगांव आनंद, शिरोली सुलतानपूर, भोरवाडी, कादळी वडगाव या गावांतील बहुतेक शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक घेतले आहे. यावर्षी वातावरणात थंडीही चांगल्या प्रमाणात पडत असल्याने या पिकाला होणारे रोगाचे प्रमाण अतीशय कमी असल्याने साहजिकच परीसरात गव्हाचे पीकही चांगल्या प्रकारे आलेले दिसत आहे. अर्थात यामुळे यंदा गव्हाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)