जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा उत्साहात

ओतूर- जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा जुन्नर येथे उत्साहात पार पडला. यावेळी तालुक्‍यातील जवळजवळ 80 शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला, अशी माहिती तालुका अध्यक्ष उपेंद्र डुंबरे यांनी दिली.
या मेळाव्याच्या निमित्ताने पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, जिल्हा नेते राजेंद्र जगताप, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष पोपट निगडे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंडे व संपूर्ण जिल्हा संघ कार्यकारीणी व महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपास्थिती होते, तसेच केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हा नेते शंकरराव लोखंडे, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुशिला डुंबरे, राज्य सल्लागार संजय डुंबरे, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष सुदाम ढमाले, शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र वाजगे, सरचिटणीस विजय लोखंडे, संपूर्ण कार्यकारीणी, जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष व संघटना पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे व सरचिटणीस खंडेराव ढोबळे व जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व प्रवेश करणाऱ्या सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उपेंद्र डुंबरे व नेते भरत बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यकारीणी व संघ शिलेदारांनी उत्तम प्रकारे केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)