जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील दीडशे आदिवासी दिव्यांगांना “आधार!’

  • विधायक : आप्पा प्रतिष्ठान तर्फे 160 दिव्यांगांना मदत
  • आधुनिक युगात सामाजिक संस्थांची गगनझेप

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – येथील समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यांतील आदिवासी भागातील 160 दिव्यांग महिला व पुरुषांना कुबड्या व तीन चाकी सायकलींचे वाटप केले. प्रतिष्ठानच्या विधायक उपक्रमाने त्यांना “आधार’ मिळाला. आदिवासी गरजूंना मदत करणाऱ्या संस्था कौतुकास पात्र आहेत. शासकीय योजनांत त्यांना सामावून घेण्यात येईल. दिव्यांगांसाठी समाजाने अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास त्यांचे मनोधैर्य देखील वाढीस लागेल, असे गट विकास अधिकारी सतीश गाढवे म्हणाले.

जुन्नरचे तहसीलदार किरणकुमार काकडे, गट विकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब काशिद, आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्‍लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष अजय पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, महिंद्रा कंपनीचे प्रकल्प प्रमुख संदीप पानसरे, राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विवेक तांबोळी, पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बनकर, जुन्नर अपंग सेलच्या अध्यक्ष पुष्पा गोसावी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

संतोष खांडगे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. जुन्नर जन्मभूमीशी जोडलेली नाळ आप्पांनी हयातभर जपली. त्यांच्या पश्‍चातही समाजसेवा होत आहे. प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, महिंद्रा कंपनीचे प्रकल्प प्रमुख संदीप पानसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बनकर यांनी यावेळी भाषण केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कैलास काळे, बाळासाहेब शिंदे, मिलिंद शेलार, लक्ष्मण मखर, विलास भेगडे, रोहित लामखेडे यांनी संयोजन, संदीप पानसरे यांनी प्रास्ताविक, एफ. बी. आतार यांनी सूत्रसंचालन व संदीप खोंड यांनी आभार मानले.

शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. आप्पा प्रतिष्ठानने त्याही पुढे एक पाऊल टाकून आदिवासी दिव्यांगांसाठी केलेली मदत अनमोल आहे. दगडात देव न शोधता माणसात शोधण्याचे काम प्रतिष्ठानने अन्य संस्थांना सहभागी करून घेऊन केले.
– किरणकुमार काकडे, तहसीलदार, जुन्नर.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)