जुन्नरला व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक

आपल्या उमेदवारालाच मतदान केल्याची होणार खात्री

जुन्नर- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्या उमेदवारालाच मत दिल्याची खात्री होण्याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इव्हीएम मशीनसोबत व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन जोडण्यात येणार आहे. जुन्नर विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी या व्हीव्हीपॅट मशीनची ओळख व माहिती होण्याकरिता निवडणूक शाखेच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू केल्याची माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.
जुन्नर तालुक्‍यातील 9 मंडलांमधील 356 मतदान केंद्रांवर सदर मशीनचे प्रात्यक्षिक तज्ज्ञ प्रशिक्षक मतदारांना दाखविणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र वळवी यांनी दिली. या नवीन मशीनमुळे मतदारांना बटन दाबल्यावर आपण कोणाला मतदान केले आहे, हे पुढील सात सेकंदापर्यंत स्क्रीनवर दिसणार आहे. या जनजागृती मोहिमेकरिता दोन पथके तयार करण्यात आली असून, या पथकांमध्ये एक मंडल अधिकारी, तीन तलाठी, एक आयटीआयचे तज्ज्ञ प्रशिक्षक, एक पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.
याप्रसंगी तहसीलदार हनुमंत कोळेकर, अप्पर तहसीलदार प्रियंका ढोले, नायब तहसीलदार सचिन मुंढे, मंडलाधिकारी शोभा भालेकर, तलाठी अशोक गायकवाड, तज्ज्ञ प्रशिक्षक सचिन काजळे, अजित परदेशी, रवींद्र काजळे, नरेंद्र तांबोळी, निलेश गायकवाड, स्वप्नील दप्तरे आदी मान्यवर उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)