जुन्नरमध्ये विजयोत्सव साजरा

जुन्नर- भारतीय हवाई दलाच्या जवानांनी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. मिराज विमानांनी हल्ला करण्यात आलेले बालाकोट हे पाकमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील असून, चकोटी व मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये आहेत. या जोरदार कारवाईचा विजयोत्सव जुन्नर शहरात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जुन्नर पालिकेसमोर भारतमातेचे पूजन करून फटाक्‍यांच्या माळा लावण्यात आल्या. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणा देत भारतमातेचा जयजयकार करण्यात आला व उपस्थितांना पेढे वाटण्यात आले, तसेच शहरातील तांदूळ बाजारात नागरिक उत्स्फूर्तपणे जमा होऊन फटाके वाजवण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. गंभीरमल कर्नावट, बाळासाहेब दुबे, नगरसेवक वैभव मलठणकर, फिरोज पठाण, शहराध्यक्ष नंदू तांबोळी, नीलेश गायकवाड, गणेश बुट्टे, युसूफ शेख, रफिक तकी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)