जुन्नरमध्ये मंगळवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आळेफाटा-कामगार दिनानिमित्त जुन्नर येथे (दि. 1) रोजी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी मिळावी व पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत यूनियनच्या वतीने येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे तालुका अध्यक्ष जनार्दन मुळे व कोषाध्यक्ष सत्यवान अभंग यांनी दिली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी व पेन्शन मिळावी म्हणून राज्य शासनाने दोन ऑगष्ट 2017 रोजी एक समिती गठीत केली होती. या समितीला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊनही समितीच्या वेळखाऊ धोरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी व पेन्शन देण्यास विलंब होत आहे. यामुळे मंगळवारी एक मे रोजी कामगार दिनानिमित्त जुन्नर तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जुन्नर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत गटविकास अधिकारी सतिश गाढवे यांना युनियनच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे, असे ही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)