जुन्नरचे तहसीलदार काकडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन

जुन्नर-जुन्नर शहर व परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुन्नर तहसील कार्यालयात तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अव्वल कारकून अविनाश कुलकर्णी, धर्मा गवारी, राजू कुऱ्हाडे यांसह कर्मचारी उपस्थित होते. जुन्नर शहरातील विविध शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयात मुख्याध्यापक रोहिदास भागवत, पर्यवेक्षक जयश्री हेंद्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अशोक साळवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)