जुन्नरचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्‍यांत व्हावा

नारायणगाव-जुन्नर तालुक्‍यात पडलेल्या दुष्काळाची परिस्थितीमुळे पश्‍चिम मावळ पट्ट्यामध्ये भाताच्या पिकांचे झालेले नुकसान जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल बेनके यांनी केली आहे. दरम्यान गुरुवारी (दि. 24) संपूर्ण मावळ पट्ट्यामधील आदिवासी गावांना भेटी देत त्या ठिकाणी भात पिकाची पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.
जुन्नर तालुक्‍याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्‍यांच्या यादीमध्ये समाविष्ट होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई किंवा योजनांचा लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे जुन्नर तालुक्‍याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्‍यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन लवकरच तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थिती चा अहवाल देऊन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी पवार यांच्या माध्यमातून करणार आहे. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण मागील वर्षी पेक्षा कमी आहे. पश्‍चिम पट्ट्यात भाताचे मुख्य पीक घेतले जाते. इंद्रायणी, आंबेमोहोर, अशा विविध जातीच्या प्रकाराचे भात पीके घेतली जातात. या भाताची शेती पाण्याअभावी धोक्‍यात आली आहे. पिके पिवळी पडून आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. रब्बी हंगाम वाया जाणार आहे. भाताचे पीक चांगले झाले तरच आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होतात. भाताच्या शेतीवरच पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन असते. या दौऱ्यात पांडुरंग पवार, शरद लेंडे, दिनेश दुबे, भाऊ कुंभार, संभाजी लोहोटे, मुन्ना शेख, यासीन सय्यद, तुषार थोरात, सूरज वाजगे, ज्ञानदेव बोराडे, भाऊ देवडे, सीताराम खिलारी, रवींद्र शिंदे, महेंद्र पवार, संतोष खिल्लारी, दत्तात्रय खिलारी, मधुकर मातेले, काशिनाथ खुळे, प्रकाश कामटकर, संतोष मंडलिक, पार्वता डामसे, विजय मार्तंड, भालचंद्र शिंदे, संभाजी उकिरडे, विठ्ठल खिल्लारी, देवराम खिलारी, आनंद खिलारी, तुकाराम खिलारी, भाऊ खिलारी, चंद्रकांत देवाडे, बुधाजी तळपे, तुकाराम खिलारी, चंद्रकांत तळपे, बाळू तळपे, माऊली काजळे, हौसाबाई रावते, लक्ष्मण मातेले, दगडू डामसे, रामदास चव्हाण, दशरथ मातेले, खेमा शेळकंदे, धोंडीबा खिलारी, श्‍याम वाघमारे, आदी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)