जुनी पेन्शन अधिसूचनेचा जुन्नरमध्ये निषेध

ओतूर – महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्‍टोबर 2005 रोजी अन्यायकारक आदेश काढून 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांची हक्काची जुनी पेन्शन योजना हिरावून घेऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य अंधकारमय केले आहे, त्यामुळे नोव्हेंबर 2005 नंतरच्या मृत बांधवांच्या कुटुंबावर हलाखीची परिस्थिती आली आहे.
तेरा वर्षांपूर्वी लागू केलेल्या या अन्यायकारक आदेशाचा जाहीर निषेध म्हणून बुधवारी (दि. 31) जुन्नरमधील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. 31ऑक्‍टोबर 2005 रोजी काढलेला शासन आदेश रद्द करावा यासाठी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना निवेदन तहसीलदारांमार्फत देण्यात आले. याप्रसंगी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उपेंद्र डुंबरे, शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वैभव सदाकाळ, अध्यक्ष प्रभाकर दिघे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)