जुनी पेंशन हक्‍क संघटनेच्या वतीने नारायण कांबळे यांचा सत्कार

वडगाव मावळ : जुनी पेंशन हक्‍क संघटनेच्या वतीने नारायण कांबळे यांचा सत्कार करताना पदाधिकारी व शिक्षक.

वडगाव मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल नवनियुक्‍त अध्यक्ष नारायण सीताराम कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना मावळच्या वतीने राज्य प्रवक्‍ते जगदिश ओहोळ, मावळ तालुकाध्यक्ष गंगासेन वाघमारे, सचिव रामेश्‍वर पवार, नेते पंढरीनाथ मानकर, दत्तात्रय भालेराव आदींच्या हस्ते संस्थेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.

पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कांबळे, उपाध्यक्षपदी संतोष भारती, तर कार्यकारी संचालक म्हणून जालिंदर कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंभूराजे पाटील, राज्य सरचिटणीस केशव जाधव, राज्य संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुहास विटे, गटाच्या नेत्या शोभा वहिले, खेडचे विनोद चव्हाण, मुळशी तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती राहुल लोंढे, बारामती तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती रवींद्र तावरे, खेड तालुका आदिवासी उन्नती संघटनेचे अध्यक्ष अशोक बांगर, बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे, पुणे जिल्हा पतसंस्थेचे संचालक कुंडलिक कांबळे यांच्यासह बाबासाहेब औटी, रघुनाथ रोकडे यांच्यासह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)