“जुता चुराई’साठीच्या भेटीमुळे परिणिती खूष

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाला आता एक महिना होत आला आहे. मात्र त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याशी संबंधित बातम्या अजूनही मीडियामध्ये येत आहेत. या लग्नामध्ये प्रियांकाची बहीण परिणितीने निक जोनासकडे “जुता चुराई’च्या विधीसाठी लाखो रुपयांची मागणी केली होती. निकने देखील उदार मनाने आपल्या सालीची ही हट्टाची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासनही देऊन टाकले होते. मात्र, ही लाखो रुपयांची वसुली करण्यात परिणिती यशस्वी झाली की नाही, हे स्पष्टपणे समजू शकलेले नव्हते.

आता त्याचा तपशील उजेडात यायला लागला आहे. निक जोनासने आपल्या लाडक्‍या मेव्हणीला एक डायमंड रिंग भेट दिली आहे. नेहा धुपियाच्या “वोग एफएफ’ या चॅट शो मध्ये परिणितीने हा खुलासा केला आहे. प्रियांकाचे लग्न, त्यावेळी केलेली धमाल, मिळालेली गिफ्ट आणि निक जोनासकडून मिळालेले सरप्राईज गिफ्ट या सगळ्यांबाबत तिने कोणतेही आढेवेढे न घेता सगळी माहिती सांगून टाकली. निककडून “जुता चुराई’साठी हजारो डॉलर उकळण्याचा तिचा इरादा होता. मात्र, निकने आपल्या मित्रांना इशारा केला आणि डायमंड रिंग्जचा एक ट्रे तिच्यासमोर आणला गेला. हा ट्रे बघितल्यावर त्याच्या सगळ्या मेव्हण्या खूष झाल्या होत्या. निक आणि प्रियांकाने जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये 1 डिसेंबर 2018 रोजी ख्रिश्‍चन पद्धतीने आणि 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या लग्नानंतर दिल्ली, मुंबई आणि वॉशिंग्टन आदी ठिकाणी ग्रॅन्ड रिसेप्शनही दिले गेले आहे. त्यामध्ये हॉलिवूड, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)