जुगार खेळताना चार जणांना पकडले

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील रांजणी येथे जुगार खेळताना मंचर पोलिसांनी चार जणांना रंगेहात पकडले आहे. तसेच 5 हजार 975 रुपये रोख तसेच 1 लाख 44 हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली असा एकुण 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एस. एस. माताडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदिप सिताराम सूर्यवंशी (वय 32), विलास तुकाराम मुळुक (वय 47), पोपट सुकाजी वाघ (वय 55), चंद्रप्पा मलप्पा पेंदी (वय 39 सर्व रा. रांजणी) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस आल्याची माहिती मिळताच बंडू पवार (रा. निमगाव सावा) व संदिप मुळे (रा. मांजरवाडी) हे शेजारील शेतात पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार रांजणी गावच्या हद्दीत मिनानदीच्या कडेला उसाच्या शेतात बाजूला चिंचेच्या झाडाखाली आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील एक पत्त्याचा कॅट, एक बॉलपेन, रोख रक्‍कम व मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)