जुगार खेळणाऱ्या दहा जणांना अटक

पिंपरी – पिंपळे गुरव येथे सांगवी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारून दहा जणांना अटक केली आहे.

धनंजय मारुती चव्हाण (वय-50, रा. अप्पर पुणे), सोमनाथ नारायण महाजन (वय-35 रा.खडकी), दीपक सुरेश लोखंडे (वय-27, रा. खडकी), विजय श्रीरंग शिवशरण (वय-55, रा. रहाटणी), करीम इक्‍बाल शेख (वय-25, रा. अप्पर, पुणे), संजय मारुती सगर (वय-27, रा. थेरगाव), अनुज गुज्जर सिंग (वय-23, रा. बोपोडी), चंदाप्पा रामू चव्हाण (वय-27, रा. लोहगाव), इसरत रेहमत सराफतअली (वय-33, रा. भवानीपेठ पुणे), विनोद ओमप्रकाश चंडालीया (वय-33, रा. खडकी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस नाईक कैलास पर्वतराव केंगले यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील हॉटेल महाराजा च्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या एका पत्रा शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी दहा जणांना अटक केली. तर घटनास्थळावरुन 16 हजार 710 रुपयांची रोकड, चार पावती पुस्तके, आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)