जुगार अड्ड्यावर छापा मारणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

चार कर्मचारी जखमी : आठ जणांना अटक

फलटण, दि. 15 (प्रतिनिधी) – रोजी रात्री महतपुरा पेठ मलटण, ता. फलटण येथे जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर शासकीय कामकाज करत असताना सुमारे 20 जणांच्या जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांवर दगड व विटाने केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पुरुष व महिलांसह सुमारे 20 ते 21 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 14 रोजी 8 वाजून 40 मिनिटांनी महतपुरा पेठ मलटण येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकण्यास गेले. पोलिस आल्यानंतर त्याठिकाणी मोठा जमाव जमला. जमावाने पोलीस कारवाईत अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला असता जमावाने पोलिसांवर हल्ला केला. संतोष जगन्नाथ घाडगे रा. बिरदेवनगर, फलटण, किरण विजय घाडगे रा. जिंती नाका मलटण, जीवन विक्रम घाडगे रा. तुपरी वसाहत ता. पलुस, जि. सांगली, उज्वला युवराज घाडगे रा.महतपुरा पेठ मलटण, अंजू संजय वाघमारे रा. कोथरूड डेपो संगमनगर पुणे, बबिता शिवाजी मोरे रा. काले, ता. कराड, कमल रामराव जुवेकर रा. आजाद नगर झोपडपट्टी गंगाराम टाकीजवळ पनवेल जि. रायगड, युवराज जगन्नाथ घाडगे, विजय जगन्नाथ घाडगे, किरण जगन्नाथ घाडगे, मीना विजय घाडगे, रेश्‍मा किरण घाडगे 8 ते 12 रा. महतपुरा पेठ व नाना बाळू जाधव रा. महतपुरा पेठ मलटण व त्यांच्यासोबतच्या सात ते आठ महिला व पुरुषांनी पोलीस कर्मचारी यांना हातात दगड व विटा घेऊन शिवगाळ दमदाटी केली. बाळूनाना जाधव याने जमावाला भडकावून पोलिसांवर दगड व विटा फेकून मारल्या.
या हल्ल्यात हवालदार काकडे, पोलीस शिपाई दडस, हवालदार सोनवलकर, पोलीस हवालदार येळे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांनी दिली असून सर्व संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 4 महिला व 4 पुरुष असे मिळून 8 संशयितांना अटक करण्यात आली असून, इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बुरसे तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)