जुगार अड्ड्यावरील छाप्यात 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज येथील घटना, 8 जणांना अटक
उंब्रज, दि. 11 (वार्ताहर) – पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने कोर्टी (ता. कराड) येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून 1 लाख 56 हजार रूपयांची रोख रक्‍कम, महागड्या चारचाकी गाड्या, मोटरसायकली आणि मोबाईल, असा मिळून 28 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना कोर्टी (ता. कराड) येथे शनिवारी (दि. 10) सायंकाळी घडली. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महेश रमेश चव्हाण (वय 34, रा. कालगाव, ता. कराड), हणमंत रामचंद्र शिंदे (वय 51, रा. औंध, ता. खटाव), राजेंद्र धोंडिराम जाधव (वय 39, रा. उंब्रज, ता. कराड), विजय रामचंद्र चव्हाण (वय 22, रा. चोरे, ता. कराड), राजेंद्र भास्कर गजरे (वय 50, रा. अतित, ता. सातारा), सुनिल विश्वास आवळे (वय 38, रा. मालगाव, ता. सातारा), संतोष मानसिंग नलावडे (वय 34, रा. नावडी, ता. पाटण), दीपक विश्वनाथ कमाणे (वय 57, रा. नागठाणे, ता. सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कोर्टी (ता. कराड) येथील जुन्या गावठाणातील कोटेश्वर मंदिरालगतच्या दादासो गणपत थोरात यांच्या मालकीच्या जुन्या घरात अवैधरित्या तीन पाणी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस नाईक दादासाहेब बनकर, अंकुश यादव, सचिन पाटील, पो. कॉ. मनोज शिंदे यांचे पथक तयार करून शनिवारी सायंकाळी छापा मारला. त्यावेळी त्यांना जुगार अड्ड्यावर 1 लाख 56 हजार रुपयांची रोख रक्कम, सॅंन्ट्रो, स्कार्पिओ, इन्होव्हा, महागडे मोबाईल, मोटरसायकली, असा मिळून 27 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. तो जप्त करून 8 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)