जुगार अड्ड्यांवर छापे, नऊजणांवर गुन्हा

नागठाणे, दि. 24(प्रतिनिधी) – नागठाणे व अतीत (ता. सातारा) येथे बोरगाव पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापे टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त असून एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी नागठाणे येथे बाजारतळाजवळील ऑईल मिलच्या कट्ट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून जुगार साहित्य, रोख रकमेसह तीन दुचाकी असा सुमारे 85 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी पोलिसांनी राजाराम साळुंखे, हणमंत चंदुगडे, दिलीप पवार, संजय नलावडे, मच्छिंन्द्र मोहिते, नंदकुमार साळुंखे, संजय पवार यांना ताब्यात घेतले.
अतीत येथे पोलिसांनी छापा टाकून अंकुश शिवाजी सावेकर याला चोरटी दारू विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले. यावेळी शेतात लपवून ठेवलेल्या देशी-विदेशी दारूच्या सुमारे 17,500 रुपयांच्या 195 बाटल्या जप्त केल्या. सपोनि संतोष चौधरी यांच्यासह सहाय्यक फौजदार भीमराव यादव, मनोहर सुर्वे, किरण निकम व समाधान राक्षे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)