जुगार अडड्यावर छापा : चार जणांना अटक

तळेगाव दाभाडे – अवैध ऑनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात 45 हजार 900 च्या मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी (दि.22) सायंकाळी साडे वाजता वीरचक्र चौक तळेगाव दाभाडे स्टेशन येथे ही कारवाई करण्यात आली. मयूर शिवाजी बोऱ्हाडे (वय 26 रा. शिरूर पुणे), कोमीर वसंत बुराडे (वय 28), अजय दिलीप गायकवाड (वय 19), विठ्ठल मानाजी सांगळे (वय 32 तिघे रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांना गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगीरे, कर्मचारी सुर्यकांत गोरडे, विठ्ठल वडेकर, दीपक कदम यांच्या पथकाने या जुगार अडड्यावर धाड मारली. यामध्ये आरोपी मयूर बोऱ्हाडे व त्याचे साथीदार कोमीर बुराडे, अजय गायकवाड, विठ्ठल सांगळे हे अवैधरित्या ऑनलाईन जुगार अड्डा चालवीत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम 8,400 रुपये, 42 इंची स्क्रीन टीव्ही, संगणक सीपीयू, की बोर्ड, डोंगल असा एकूण 45 हजार 900 रुपयांचा मुद्देमालाजप्त केला आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अ या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगीरे करत आहेत. वडगाव व तळेगाव परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरु राहणार असल्याची माहिती सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)