जुई, गुलाब कार्नेशियनच्या भावात वाढ

पुणे – रक्षाबंधनाच्या सणामुळे महिलांकडून जुईच्या गजऱ्याला मागणी अधिक आहे. त्यामुळे या फुलांच्या भावात गेल्या दोन दिवसांत तब्बल दुपटीने वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलछडी, डच गुलाब, कार्नेशियनच्या भावात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, मागणीअभावी इतर फुलांचे घसलेले भाव कायम आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मार्केटयार्ड येथील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. यामध्ये, बहुतांश फुलांचा दर्जा ढासळला आहे. मागणीच्या तुलनेत फुलांची आवक जास्त होत असून यामध्ये झेंडूच्या फुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परराज्यातून जर्बेरा, कार्नेशियन, डच गुलाब आदी शोभिवंत फुलांना मागणी कायम आहे.

फुलांचे प्रति किलोचे भाव पुढीलप्रमाणे :

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झेंडू : 5-15, गुलछडी : 60-100, बिजली : 20-40, कापरी : 10-30, शेवंती 40-60, ऑस्टर : 6-12, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 10-20, गुलछडी काडी : 10-40, डच गुलाब (20 नग) : 50-100, लिलिबंडल : 8-12, जर्बेरा : 30-60, कार्नेशियन : 100-180, जुई 400-700.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)