जी-मेल वापरण्याच्या सोप्प्या ट्रिक्‍स…

ई-मेलच्या जगात जी-मेल एक प्रसिध्द नाव आहे. आजच्या स्मार्ट जमान्यात ई-मेलसाठी आउटलूक, याहू, हॉटमेल अशी माध्यमे उपलब्ध आहेत, पण या सर्वामध्ये गुगलचे जी-मेल सर्वात लोकप्रिय आहे. जी-मेल यूजरसाठी मोफत मेल सेवा देते. जी-मेलचा उपयोग खाजगी आणि व्यावसायिक प्रकारे केला जातो. जी-मेल वापरण्याच्या अनेक टेक्‍निक आणि ट्रिक्‍स आहेत ज्या वापरल्याने मेलिंग करणे सोप्पे व सोयीस्कर ठरू शकते. जी-मेल सेवा ही एप्रिल 2004 मध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून जी-मेलच्या यूजरमध्ये सतत वाढ होत आहे.

जी-मेल वापरण्याच्या सोप्प्या ट्रिक्‍स :

गुगल कॅलेण्डर :
जर तुम्ही जी-मेल रेग्युलर वापरत असाल आणि जर तुम्हाला दिवस आणि तारीख आठवणीत राहत नसेल तर हे फिचर तुमच्या कामी येऊ शकते. गूगल कॅलेण्डर या फिचरला तुम्ही जी-मेल अकाऊंटशी जोडू शकता. हे जी-मेल लॅबचे फिचर आहे. यासाठी तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवर क्‍लिक करून लॅबमध्ये जावे लागेल. त्यानंतर गुगल कॅलेण्डर गॅजेटमध्ये जाऊन अनेबल करावे लागेल. यानंतर सेव्ह चेन्जेसवर क्‍लिक करावे. याला अलाऊड केल्यानंतर गूगल कॅलेण्डर गॅजेट तुमच्या इनबॉक्‍समध्ये दिसेल.

ई-मेल शेड्युल करणे :
ट्विट आणि फेसबुक पोस्ट सारखे तुम्ही आपल्या जी-मेल सुध्दा शेड्युल करू शकता. यासाठी तुम्हाला https://www.boomeranggmail.com/ बूमरेंग जी-मेलची मदत घ्यावी लागेल. यामध्ये तुम्ही तुमचा ई-मेल ड्राफ्ट करून तो पाठविण्याची वेळ ठरवू शकता. हे फिचर जी-मेलमध्ये पहिल्यापासून नसते. त्यासाठी तुम्हाला बूमरेंग जीमेल इनस्टॉल करावे लागले. इनस्टॉल केल्यानंतर यूजरला यामध्ये सेन्ड लॅटर बटन असा ऑप्शन येतो.

एकावेळेस एकापेक्षा अधिक अकाऊंट वापरणेः
हे फिचर अनेक जी-मेल यूजरला माहितच नसते आणि ते त्यासाठी वेगवेगळ्या ब्राउजर वापरतात. यासाठी तुम्हाला प्रोफाईल आयकॉनवर जावे लागेल.(हे फिचर वरच्या बाजूला उजवीकडे असते) यामध्ये अॅॅड अकाऊंट हा ऑप्शनवर टॅप करावे लागेल. येथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून एकापेक्षा अधिक अकाऊंट तुम्ही मॅनेज करू शकता. अशाप्रकारे तुम्ही एका टॅबवरून दुसऱ्या टॅबवर जाऊन अनेक अकाऊंट मॅनेज करू शकता.

अनावश्‍यक टॅब काढणेः
जी-मेल मध्ये तुम्हाला जर प्राईमरी, सोशल, प्रमोशन, अपडेट्‌स आणि फोरम असे अनावश्‍यक टॅब काढून टाकायचे असेल तर यासाठी उपाय आहे. त्यासाठी सेटींग-इनबॉक्‍स-कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्ही अनावश्‍यक टॅब काढू शकता.

अकाऊंटचा गैरवापर होतोय की नाही हे पाहणेः
तुमच अकाऊंट हे कोणीतरी ओपन करून त्याचा गैरवापर करत असल्याची शंका वाटत असेल तर तुम्ही त्याची पडताळणी करू शकता. त्यासाठी मेन पेजवरील खालच्या बाजूस लास्ट अकाऊंट अॅॅक्‍टिव्हिटी हा ऑप्शन असतो. यामध्ये डिटेल ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ब्राऊजर, आयपी ऍड्रेस आणि वेळ इत्यादी माहिती पाहू शकता.

जी-मेलमध्ये नोटिफिकेशन सुरू करणेः
या ट्रिकव्दारे जी-मेल यूजरला आलेल्या मेलसंबंधी लगेच नोटिफिकेशन मिळत राहते. (ज्याप्रकारे फेसबुक, व्हॉटसऍपला नोटीफिकेशनमुळे तुम्हाला कोणी मॅसेज पाठविला हे कळते) यामुळे महत्वाचा मेल असेल तर तुम्हाला लगेच कळू शकेल. हे फिचर अॅॅक्‍टिवेट करण्यासाठी तुम्हाला सेंटिग-जनरल-डेस्कटॉप नोटिफिकेशन सक्रिय (ऍक्‍टिव्ह) करावे लागेल. तुम्हाला जर हे फिचर नसेल पाहिजे तर तुम्ही ते सहजच ऑफ ही करू शकता.

थीम ठेवणेः
तुम्ही जर रोज जी-मेल वापरत असाल आणि एकच रंग आणि डिझाईन पाहून बोर झाला असाल तर ही ट्रीक तुम्हाला उपयोगी पडू शकते. यासाठी तुम्हाला सेटिंग-थीम्स-सेट थीममध्ये जाऊन तुम्हाला हवी असेल ती थीम तुम्ही जी-मेलला ठेऊ शकता.

जीमेल इनबॉक्‍समध्ये मॅसेजची संख्या वाढविणे किवा कमी करणेः
साधारणपणे जी-मेल इनबॉक्‍समध्ये 50 मेसेज दिसतात. पण तुम्हाला जर इनबॉक्‍समध्ये 50 पेक्षा अधिक मेसेज पाहायचे असेल तर यासाठी ही ट्रीक आहे. त्यासाठी सेटिंग-जनरल-मॅक्‍सिमम पेज साईज या ऑप्शनवर क्रमाने जा. या ठिकाणी तुम्ही पेजनुसार मॅसेजची संख्या कमी किंवा वाढवू शकता.

लिहून ठेवलेले मॅसेज पाठवायचे असतील तरः
तुम्हाला जीमेमध्ये जर कोणाला विशेष, महत्वाचे उत्तर (रिप्लाय) जे तुम्ही लिहून ठेवले आहे आणि ते तुम्हाला पाठवयाचे असेल तर ऑप्शन उपलब्ध आहे. या फिचरचा वापर करून तुम्ही आधीच लिहून ठेवलेले उत्तर (रिप्लाय) रिस्पॉन्स म्हणून पाठवू शकता. सांगायचे झाले तर जर तुमचा मेल आयडी बदलला असेल आणि काही यूजर तुम्हाला जुन्या आयडीवर मेल करत असतील तर तुम्ही जुन्या मेलवर मेल आल्यास लगेच ऑटोमॅटीक (माझा मेल बदलला आहे नवीन मेल हा आहे यावर मेल करा) असे उत्तर (रिस्पॉन्स) म्हणून पाठवू शकता. यासाठी तुम्हाला सेटिग-लॅबस-अनेबल रिस्पॉन्सेस या ऑप्शनवर क्रमाने जाऊन बदल करावा लागेल.

मोठ्या क्षमतेच्या फाईल पाठवायचे असतील तरः
जी-मेल मध्ये डेटा पाठविण्याची क्षमता 25 एमबी आहे, यापेक्षा अधिक डेटा क्षमतेची फाईल तुम्हाला पाठवयाची असेल तर पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही गुगल ड्राइव्हव्दारे 10 जीबी पर्यंतची फाईल पाठवू शकता ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त चार्जेस देण्याची गरज नाही. जीमेलमधील गुगल अॅॅप ऑप्शनसमधील गूगल ड्राईव्ह वर क्‍लिक करा आणि फाईल सिलेक्‍ट करा आणि ई-मेलव्दारे ऍटेच करून संबंधित यूजरला पाठवा.

– स्वप्निल हजारे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)