जीसॅट 11 चे प्रक्षेपण पुढे ढकलले

बेंगळुरू – भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने आपले जीसॅट 11 या उपग्रहाचे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. इस्त्रोच्या जीसॅट – 6 ए या उपग्रहाशी असलेला संपर्क तुटल्याने जीसॅट 11 च्या संबंधात आणखी काही चाचण्याघेणे आवश्‍यक ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण स्थलावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार होते.

जीसॅट 11 हा आत्ता पर्यंतचा सर्वात जड उपग्रह समजला गेला आहे. त्यात 5700 किलोचे वजन असणार आहे. त्याचे 25 मे रोजी प्रक्षेपण करण्याचे योजण्यात आले होते. तथापी ते आता पुढे ढकलण्यात आले असले तरी नवीन प्रक्षेपण तारीख मात्र अजून निश्‍चीत करण्यात आलेली नाही. हे प्रक्षेपण पुढे ढकलण्याचे अधिकृत कारण इस्त्रोने दिलेले नसले तरी या उपग्रहाच्या आणखी काही नवीन चाचण्या घेण्यासाठीच ते प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. एरियन 5 या यानातून या उपग्रहाचे प्रक्षेपण केले, जाणार होते. जीसॅट 11 हा उप्रगह 30 मार्चलाच फ्रेंच गयाना येथे नेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)