जीव धोक्‍यात घालून प्रवासी धावतात एसटी मागे

उरुळी कांचन- सध्या शाळांच्या सुट्यांचा हंगाम सुरू झाला आहे आणि पर्यायाने राज्य परिवहन मंडळाच्या बसला प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरुळी कांचन येथेही यापेक्षा काही वेगळी स्थिती नाही; परंतु पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बस या थांब्यावर न थांबता रस्त्याच्या मध्येच थांबत असल्याने प्रवासी जीव धोक्‍यात घालून एसटी पकडण्यासाठी त्यामागे रस्त्यावरून धावताना दिसत आहे.
सध्या शाळांच्या सुट्यांबरोबरच लग्नसराईही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसना प्रचंड गर्दी असल्याचे सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. मात्र, पुणे-सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन येथे या बसचे चालक ,थांब्यावर बस थांबवत नाहीत, तर रस्त्याच्या मध्येच बस थांबवत असल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे. जीव मुठीत धरून महामार्गावर बस पकडण्यासाठी प्रवाशांना या बसमागे धावावे लागत आहे.
पुण्याहून सोलापूर, बार्शी, मोहोळ, अकलूज, पंढरपूरकडे जाण्यासाठी उरुळी कांचन हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी उरुळी कांचन येथील चौकात एसटी बस थांबतात. मात्र, पुण्याहून येणाऱ्या बस या येथील थांब्यावर न थांबता रस्त्याच्या मध्येच थांबत आहे आणि प्रवाशांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. त्यासाठी प्रत्येक एसटी बस रस्त्याच्या कडेला थांबावी, अशी मागणी नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या वतीने निखिल गोते, जगदिश महाडिक आणि विकास कटके यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)