जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे – जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. पीडित मुलगी 18 आठवड्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता.
दीपक लक्ष्मण घोबाळे (वय 29, रा. शेलमोहा, पो. बडवणी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीच्या मूळ कर्नाटक येथील असलेल्या सध्या महंमदवाडी भागात राहणाऱ्या मामाने कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 24 ऑगस्ट 2016 आणि त्यापूर्वीच्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत महंमदवाडी भागात घडली. दीपक याने पीडित मुलीला तिच्या शेजारच्या घरात बोलाविले. तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करण्यापूर्वी तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अशाच प्रकारे शेजारच्या घरात बोलावून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. ती 18 आठवड्याची गर्भवती राहिली असता हा प्रकार उघड झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दीपक याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. दीपक घटना घडल्यापासून तीन महिने फरार होता. जामीन मिळाल्यास तो पुन्हा पळून जाईल. फिर्यादी, साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दीपक याचा जामीन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)