जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास पोलीस कोठडी

पुणे – चाकु पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

योगेश ऊर्फ दादा बबन काळे (वय 22, रा. कात्रज) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत वैभव दादासाहेब सावंत (वय 22, रा. कात्रज) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 6 जून रोजी कात्रज येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी योगेश याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने काळे याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)