जीवन मित्र फौंडेशनच्यावतीने आगळी वेगळी शिवजयंती

मेढा ः शहीद जवानांच्या मातोश्रींना साडी-चोळी देवून सत्कार करताना सौ. द्रौपदा मुकणे शेजारी उपस्थित मान्यवर.

मेढा, दि. 21 (प्रतिनिधी) – मेढा येथील जीवन मित्र फौंडेशनच्यावतीने यंदा शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जावली तालुक्‍यातील शहीद जवान नवनाथ सुर्वे, शशिकांत मोरे, तुकाराम ओंबळे, सुरज मोहिते, रविंद्र धनावडे, अशोक जाधव यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते छ, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. म. गांधी सार्वजनिक वाचनालयामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमांसाठी मेढ्याच्या नगराध्यक्षा सौ. द्रौपदा मुकणे, जावलीचे माजी उपसभापती कांतिभाई देशमुख, नारायणराव शिंगटे गुरूजी, व्यसन मुक्ती संघाचे राज्याध्यक्ष विलासबाबा जवळ, धनंजय पवार, संतोष कदम सर, संतोष वारागडे, शशिकांत कदम, रफिक शेख, प्रकाश परांजपे, नाना आगुंडे, प्रविण गोडसे, प्रदिप पिलके, संजय शेटे, नामदेव करंजेकर, प्रथमेश काशिळकर, सैनिक साळुंखे उपस्थित होते. जीवन मित्र फौंडेशनच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या आईंना साडी-चोळी व छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांसाठी परिसरातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)