जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीची गरज

वाई : शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्रदान करताना रोटरी क्‍लबचे पदाधिकारी.

प्रशांत कोठडिया यांचे प्रतिपादन, राष्ट्र शिल्पकार पुरस्काराचे वितरण
वाई, दि. 9 (प्रतिनिधी) – शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानरूपी प्रकाश भरण्याचे काम करतात. तंत्रज्ञांनाच्या युगात सामाजिक संवेदना महत्वाच्या आहेत. प्रचलित शिक्षण पद्धती ही घोकमपट्टीवर आधारित असून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना या शिक्षण पद्धतीत वाव मिळत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण व शिक्षण तज्ञ प्रशांत कोठडिया यांनी केले. वाई रोटरी क्‍लबच्या राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, सचिव अजित क्षीरसागर, प्रकल्प प्रमुख स्वाती हेळकर, मदनकुमार साळवेकर, डॉ. शरद अभ्यंगकर, डॉ. शंतनू अभ्यंग कर, डॉ. संजीवनी कद्दू, मदन पोरे, राजेंद्र धुमाळ, विठ्ठल माने, पाचगणी रोटरी क्‍लब अध्यक्ष विजय भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गटशिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे म्हणाले, वाई तालुक्‍यातील बहुंताश प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या असून यामधील साठ टक्के शाळा डिजिटल क्‍लास रूम झाल्या आहेत. शंभर टक्के शाळा डिजिटल क्‍लास रूम बनविण्याचे पंचायत समितीच्या शिक्षण विभागचे उद्दिष्ठ आहे. यामध्ये वाई रोटरी क्‍लबचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. राज्य शासनाने संपूर्ण राज्यातून फक्त तेरा शाळा ओजेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बनविण्यासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये बोपर्डी प्राथमिक शाळेचा समावेश आहे. ही वाई तालुक्‍यासाठी अभिमानाची बाब आहे.
वाई रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले, रोटरी क्‍लबच्या माध्यमातून वाईच्या पश्‍चिम भागातील धोम हायस्कूलमध्ये डिजिटल क्‍लास रूम, हॅपी स्कूल. इ-लर्निंग सुरु करण्यासाठी रोटरीने वाई तालुक्‍याच्या ग्रामीण भागात भरीव योगदान दिले आहे. रोटरी क्‍लब वाईने कवठे आणि खानापूर जिल्हा परिषद शाळेत हॅपी स्कूल प्रकल्प पूर्ण केला आहे. तर वाशिवली, आसरे, धोम या तीन ग्रामीण भागातील हायस्कूलमध्ये प्रत्येकी एक डिजिटल क्‍लास रूम तयार करून दिला आहे. वाई रोटरी क्‍लबने नवीन वर्षात ग्रामीण भागात भरीव कामगिरी करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वाई रोटरी क्‍लबच्यावतीने तालुक्‍यातील पंचवीस शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरॅक्‍टर क्‍लबच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)