जीवनातून आनंद घ्या – मारूती यादव

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात तीन दिवसीय व्याख्यानमाला

लोणी काळभोर- दुसऱ्याचे दु:ख बघून जो आनंदी होतो, तो दानव असतो. तर दुसऱ्याचे सुख बघून जो आनंदी होतो, तो महामानव होतो. म्हणून जीवन हे आनंद घेण्यासाठी आहे, असे मत मारुती यादव यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल शिक्षण मंडळ अंतर्गत येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात तीन दिवसीय संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ व्याख्यानमाला पार पडली. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आनंदाची लयलूट – “एकपात्री प्रयोग’ या विषयावर गुंफताना मारुती यादव बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे, बहिशाल शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉ. अंबादास मंजूळकर, डॉ. शेखर पाटील, बाळासाहेब जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपान काळभोर, उपाध्यक्ष अशोक कदम, सचिव सुभाष काळभोर, कोषाध्यक्ष धनंजय फलटणकर, कार्याध्यक्ष सुरेश कुंजीर, सहसचिव अशोक आगवणे, ज्येष्ठ समाजसेवक श्रीधर लोखंडे, गणपतराव गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मारुती यादव म्हणाले, इतरांच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला तर आनंदाची लयलूट करता येईल. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सिताराम शिंदे यांनी “संत तुकारामांच्या अभंगातून समाज प्रबोधन’ या विषयावर गुंफले. यावेळी शिंदे म्हणाले, साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा पद्धतीने जगल्यास तसेच समाजातील रंजल्या गांजल्यांची सेवा केल्यास परमेश्वर नक्कीच भेटतो.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प राजस्थान राज्यातील बनवारीलाल जोशी यांनी “हसिए, हसाइए और स्वस्थ रहिए ‘या विषयावर गुंफले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहिशाल शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉ. अंबादास मंजूळकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. संतोष भड, तर उपस्थितांचे आभार प्रा. एच व्ही डेंगळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)