जीवनातील संघर्षच मानसाला शिखरावर पोहोचवतो

पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन

भोर- देवांचा देव असलेल्या इंद्रापेक्षा ही लेखक अधिक सुखी असतो. त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास आणि संघर्ष हाच त्याला विजयाच्या शिखरावर घेऊन जातो, असे प्रतिपादन जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे केले.
भोर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात सुरेश शिंदे लिखित “पासोडी’ या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाषचंद्र डांगे, इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी, भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, कवी विजय सातपुते, जयश्री घुले, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव सावंत, लेखक नंदू लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी बलकवडे म्हणाले की, भोर ही महाराष्ट्रातील संस्कृतीचे खरे पीठ असून या भूमीला ऐतिहासिक महत्व आहे. सकारात्मक विचार माणसे घडविण्याचे काम करतात. माणसे जोडणे ही जगातील सर्वात मोठी संपत्ती असून सुरेश शिंदे यांनी हे काम पासोडी या पुस्तक रुपी खजिन्यातून केले आहे. यावेळी डॉ. उदय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशक गिरीश भांडवलकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. विक्रम शिंदे यांनी केले. सुरेश शेटे यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)