जीवनातील कर्मानुसारच फळ मिळते

  • पुलकसागरजी महाराज : “खान पान और खानदान’वर मार्गदर्शन

बारामती – जीवन जगताना जी कर्म कराल त्या कर्मानुसारच तुम्हाला फळ मिळते, जसे कराल तसेच तुम्हाला त्याची परतफेड होईल, त्यामुळे जीवन जगताना सतत दुसऱ्याचा विचार करुन जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असा संदेश राष्ट्रसंत 108 पुलकसागरजी महाराज यांनी दिला.
चातुर्मासानिमित्त दिगंबर जैन बांधवांच्या वतीने आयोजित ज्ञानगंगा महोत्सवात “खान पान और खानदान’ या विषयावर ते बोलत होते. शाकाहाराचा स्वीकार सर्वांनी करायला हवा या सूत्रावर त्यांनी आज भर दिला. जीवन व्यतित करताना प्रत्येकाने एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी की स्वतः मधील गुणांचा विकास झाला नाही तरी आपल्या अंगी अवगुण येणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले. भोजन करतानाही काय, कधी, कसे व किती खायचे याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. मांसाहार केल्याने कोप, तामसिक भावना वाढीस लागते, आपल पोट भरण्यासाठी इतरांचे जीवन संपुष्टात आणणे ही बाब चुकीची आहे.
संपूर्णपणे मांसाहारावर कुणीच जगू शकत नाही मात्र, पूर्णपणे शाकाहारी राहू शकतात, त्यामुळे याचाही विचार व्हायला हवा असे ते म्हणाले. आज अनेक शाकाहारी घरांमध्येही अप्रत्यक्षपणे मांसाहार शिरला आहे, हा अप्रत्यक्ष मांसाहार रोखण्यासाठी मोहिम हाती घेण्याची गरज महाराजांनी बोलून दाखविली. मांसाहारामुळे अंगात अधिक ताकद येते असे सांगितले जाते मात्र, शाकाहारी लोकही शक्‍तीवान असतात असे ते म्हणाले. जाहिरातींच्या भडीमाराला बळी न पडता सारासार विचार नजरेसमोर ठेवून निर्णय घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जे प्राणी शाकाहारी आहेत ते कधीच काहीही झाले, तरी मांसाहार करत नाहीत माणूस हा एकमेव असा आहे की जो शाकाहारी असूनही मांसाहार करतो, त्यामुळे प्रत्येकाने यावर विचार करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.

  • “आज बेटी बचाओ’वर व्याख्यान
    पुलकसागरजी महाराज रविवारी (ता. 13) “बेटी बचाओ’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता श्री महावीर भवन येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)