जीवनशैली निर्देशांक; नागरिकांच्या सूचना

पिंपरी – केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत 32.2 गुण मिळवत पिंपरी-चिंचवड शहर 69 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मात्र, आता शहराला या पाहणीत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे शहर परिवर्तन समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्याकरिता येत्या आठ दिवसांत नागरिकांकडून शहर विकासाच्या सुचना मागविण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन दशकात वेगाने वाढणारे शहर म्हणून उद्योगनगरीचा देशात तिसरा क्रमांक लागतो. शहर विकासाचा दर 70 टक्के इतका असून तो इतर शहरांपेक्षा जास्त आहे. परंतु, बदलत्या काळामुळे आज अनेक उद्योग शहराबाहेर जात आहेत व रहिवासी शहर म्हणून नविन ओळख प्राप्त होत आहे. त्यामुळे शहर विकासाबरोबरच झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकाम, आरोग्य, शिक्षण अशा अनेक समस्या देखील वाढत आहेत. त्या सोडविण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा लागणार असल्याचा या बैठकीतील सूर होता.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी अभियानात तिसऱ्या टप्प्यात समावेश होऊनदेखील पिंपरी-चिंचवड शहर यामध्ये 83 व्या क्रमांकावर आहे; तर स्वच्छ भारत अभियानात शहराचे 43 वे स्थान आहे. स्थायी समिती सभागृहात शनिवारी (दि.1) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आश्‍वासक प्रयत्नांवर चर्चा…
केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या देशातील शहरांमध्ये पुणे सुखावह जगण्यासाठी सगळ्यात चांगले ठिकाण असून पहिल्या क्रमांकावर आहे. तर, पिंपरी-चिंचवडने 69 वा क्रमांक मिळविला आहे. राज्यातील दहा शहरांमध्येदेखील हे शहर स्थान मिळवू शकलेले नाही. देशभरातील एकूण 116 शहरांमध्ये 69 वे स्थान आहे. आता हे स्थान उंचाविण्यासाठी केल्या जाणाऱ्या आश्‍वासक प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)