जीवनदायी योजनेतून रुग्णांची लुट थांबवा, अन्यथा कारवाई – राजेश क्षीरसागर

सिटी हॉस्पिटलवर केली इनपॅनलची कारवाई

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेतून रुग्नालयांमार्फत रुग्णांची होणाऱ्या लुटीच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, यावर आळा घालण्यासाठी जीवनदायी योजनेतून रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांची गय केली जाणार नाही. प्रसंगी योजनेतून तत्काळ परवाने रद्द करणेत येतील, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज सीपीआर रुग्णालय येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यासह कोल्हापूर शहरातील सिटी हॉस्पिटल विरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन रुग्णालयावर योजनेतून इनपॅनल करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी दिली.

या बैठकीच्या सुरवातीस आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसून, रुग्णांची आर्थिक लुट होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसून ठराविक रुग्णालयांचा मनमानी कारभारास खतपाणी घातले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोल्हापूर शहरातील सिटी हॉस्पिटल विरुद्ध आयब दस्तगीर मुल्ला व आकाश पाटील तसेच इतर रुग्णांची लाखो रुपये रक्कमेची लुट केली असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असल्याचे जीवनदायी योजनेचे जिल्हासमन्वयक डॉ. सागर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून अशा रुग्णालयांचे योजनेतून परवाने रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. यासह जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एल.एस. पाटील यांनाही या योजनेविषयी कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याची सक्त सुचना दिली.

ते पुढे म्हणाले कि, या योजनेविषयी जनतेमध्ये जनजागृती करून, ही योजना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु असून या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना या रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत 100 टक्के निशुल्क सेवा देण्यात येत असून जनतेने खाजगी रुग्णालयांना पसंती न देता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास पसंती देण्याचे आवाहन केले. यावेळी रुग्णांची लुट करणाऱ्या सिटी हॉस्पिटलवर योजनेतून इनपॅनल करण्याची कारवाई करण्यात आली. असून अशा कोणत्याही तक्रारी दाखल झाल्यास सदर रुग्णालयावर प्रशासन तत्काळ कारवाई करेल, अशी माहिती जीवनदायी योजनेची जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांनी दिली.

या परिषदेमध्ये अधिष्ठाता मा. जयप्रकाश रामानंद यांनी या योजनेचे विस्तृतरित्या कामकाज विषद करून महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये 9 व्या स्थानावर असून, महाराष्ट्र राज्यामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यामध्ये 5 व्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सीपीआर प्रथम क्रमांकावर असल्याचे विशेष नमूद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)