जीवनगाणे: खरी सुंदरता?

अरुण गोखले

रात्रीची जेवणं उरकून मुुले आजोबांच्या भवती अंगणात गोळा झाली. त्यांच्या चर्चेचा विषय होता- सुंदरता.
जेवताना निघालेल्या त्या विषयाला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी आजोबांनीच आता मुलांना प्रश्‍न विचारला की, माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं सौदर्य कोणतं?
मोहन म्हणाला, माणसाला लाभलेलं सुंदर सुडैल सशक्‍त आणि बलवान शरीर हे त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचं सौंदर्य, होय ना आजोबा?
त्यानंतर मुलींची बाजू मांडताना सुलू म्हणाली, मोहक रूप, नाजूक बांधा, लावण्य, सुंदरता हे स्त्रीचं सौंदर्य, होय की नाही?
होय.- आजोबा म्हणाले.
तेव्हा इतका वेळ शांत बसलेला आणि केवळ ही चर्चा ऐकत असलेला विवेक म्हणाला, आजोबा! तुम्ही तर त्या दोघांच्याही उत्तराला योग्य म्हणालात. पण मला त्या दोघांपेक्षा काही वेगळच मत मांडायचे आहे.
असं का, काय वेगळं सांगायच आहे तुला ऐकू तरी दे आम्हाला, सांग बरं. आजोबा म्हणाले. विवेक म्हणाला, पुरुषाला लाभणारी शारीरिक सुडौलता काय किंवा स्त्रीला लाभणार सुंदरता काय या दोन्ही गोष्टी या देवाची देणगी आहे. ती सर्वांनाच आणि सारखीच मिळेल असं काही सांगता येत नाही, तसं दिसतंही नाही. त्यामुळेच मला असं वाटत की या बाह्य शारीरिक सुंदरतेपेक्षाही माणसाच्या मनाच्या सुंदरतेला, त्याच्या उत्तम विचार आचारला खरी सुंदरता मानायला हवी, नाही का?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचं हे उत्तर ऐकलं आणि आजोबा म्हणाले, वा उत्तम, विवेका! तू जे म्हणतोस ना तेच खरं आहे. व्यक्तीचे सौंदर्य म्हणजे तिचे सुडौल शरीर नव्हे, तर बुद्धिमत्ता, गुण हेच तिचे खरे सौंदर्य. ती खरी त्याची सुंदरता. आपल्याकडे ह्याची अनेक उदाहरणे आहेतच की. अष्टावक्र शरीराने जरी आठ ठिकाणी वेडावाकडा होता तरी त्याच्या विचारांच्या पवित्रतेमुळे व बुद्धिमत्तेमुळे सर्वाना त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागले. चाणाक्‍य कुरूप होता पण त्याच्या बुद्धिमत्तेला तोड नव्हती. बिरबल ही काही फार रुपवान नव्हता पण त्याच्या चातुर्याला अजूनही लोक सलाम करतात. सुंदरता ही खरी शरीराची नाही तर ती मनाचीच हवी. उंचीनं खुजी असणारी माणसं ही जेव्हा आपल्या कर्तृत्वाने आकाशाएवढी उंची गाठतात, तेव्हा ती लहान नाही तर खऱ्या अर्थाने मोठी मानली जातात. म्हणून व्यक्‍तीचं रूप पाहू नका, त्याचे गुण पाहा, खरी सुंदरता पारखण्यात चूक करू नका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)