जीप व दुचाकीचा अपघातात एक ठार

वाठार स्टेशन, दि. 14 (वार्ताहर) –
जीप व दुचाकीची देऊर ओढ्याजवळ समोरसमोर भीषण धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश बाजीराव बागल (वय 33, रा मलगाव, ता. जि. सातारा) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
वाठार स्टेशन येथील येथील नितीन सुरेश पवार हे आपल्या जीपमधून साताऱ्याचे दिशेने निघाले होते. ते देऊर येथील ओढ्यानजीक आले असताना समोरुन आलेल्या गणेश बागल यांच्या दुचाकीला त्यांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीवर असलेले गणेश बागल यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद वाठार पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी दिलीप नेवसे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)