जीपीएस लागले, मात्र मॉनिटरिंगच नाही

टॅंकर हद्दीबाहेर जात असल्याचे चित्र : हवे त्या शुल्काचा हव्यास

पुणे – शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे टॅंकरची मागणी वाढत असतानाच हद्दी बाहेर सुरू असलेल्या बांधकामांना हे पाणी विकणाऱ्या टॅंकरला पालिकेने जीपीएस यंत्रणा बंधनकारक केली आहे. मात्र, त्याचे मॉनिटरिंग करणारी यंत्रणाच उभारलेली नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून हवे ते शुल्क दिले जात असल्याने टॅंकरधारक पाणी विकत आहेत.

कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने ऐन सणासुदीत शहराचे पाणी कमी केले आहे. परिणामी उपनगरात पाण्याची ओरड सुरू झाली असून अनेक खासगी सोसायट्यांना पाण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. तर, महापालिकेकडून हद्दीबाहेर दिल्या जाणाऱ्या पाण्यातही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातूनही पाण्याची मागणी येत आहे. त्यासाठी पालिकेकडून टॅंकर उपलब्ध करून देण्यात येतात. यात पालिकेचे 50 टॅंकर असून खासगी टॅंकरची संख्या 300 पेक्षा अधिक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकांच्या नावाखाली पालिकेकडून हजार ते 1200 रुपयांना टॅंकर घेऊन पुढे हद्दीबाहेर ते 3 ते 4 हजार रुपयांना बांधकाम व्यावसायिकांना विकले जातात. त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याची मागणी गेल्या तीन वर्षांत स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. मात्र, टॅंकर लॉबीकडून पालिकेवर दबाव आणून हे आदेश मागे घेण्यास भाग पाडले जात होते. मात्र, करार करतानाच पालिकेने ही यंत्रणा बसविणे बंधनकारक केल्याने टॅंकर मालकांनी जीपीएस लावले आहेत. मात्र, आता पालिकेकडे नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही.

 

मॉनिटरिंग नाहीच
एका बाजूला टॅंकर चालकांनी जीपीएस यंत्रणा बसविली असली तरी, त्याला मॉनिटरिंग करणारी यंत्रणा उभारलेली नसल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती असून ही यंत्रणा असूनही काहीच फायदा होत नाही. त्यामुळे पूर्वी प्रमाणेच पाणी शहराबाहेर जाते किंवा नाही याची कोणतेही कल्पना महापालिकेस नसल्याचे वेलणकर म्हणाले. तसेच तातडीनं ही यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली.

 

शहरात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा स्थितीत पाणी जादा पैसे मिळतात म्हणून हद्दीबाहेर बांधकामांना विकणे गैर आहे. ही बाब लक्षात घेऊन जर टॅंकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली असेल तर पालिकेने तातडीनं त्यासाठी नियंत्रण कक्ष उभारावा.
– भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)