जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कराड,  (प्रतिनिधी) -रस्त्याकडेला थांबलेल्या मोटरसायकलला भरधाव जीपने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास कराड-चांदोली मार्गावरील काले, ता. कराड गावच्या हद्दीतील पाटीलमळा येथे घडली. जयवंत निवृत्ती माळी (वय 40, रा. पाटील मळा, काले) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटील मळा (काले) येथील जयवंत माळी यांचा पुतण्या अक्षय माळी यांचे पाटील मळा हद्दीत परीटकी नावाच्या शिवारात कराड-चांदोली रस्त्यालगत ओंकार इंजिनिअरींग (फॅब्रिकेशन) वर्कशॉप आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे वर्कशॉप सुरु होते. पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जयवंत माळी हे एम 80 मोटरसायकलवरुन (क्र. एम. एच. 11 एम. 9059) जेवणाचा डबा घेवून आले होते. रस्ता ओलांडून रस्त्याच्या साईडपट्टीवर त्यांनी गाडी थांबविली. गाडीवरुन उतरत असताना उंडाळे बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या जीपने (क्र. एम. एच. 11 एच. 5885) त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. तसेच गाडीसह माळी यांना जीपने 30 ते 40 फूट फरफटत नेले. अपघातानंतर जीप तेथेच सोडून चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी जयवंत माळी यांना त्यांचा पुतण्या अक्षय व वर्कशॉपमधील कामगारांनी कराडच्या सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गुरूवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वर्कशॉपमधील कामगार रोहीत बाजीराव पाटील यांनी कराड ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)